योजना क्र.१२ :- केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची पूर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती अर्थसहाय्य योजना

योजना माहिती

नाशिक महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागा व्दारे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) व महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची पूर्व व मुख्य परिक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती अर्थसहाय्य मिळणे’ या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य करणेंत येत आहे.

अ.क्र. लाभार्थ्यांचा तपशील प्रति अर्जदार द्यावयाची रक्क्म
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ची पूर्व परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगांसाठी र.रु. 50,000/-
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ची मुख्य परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगांसाठी र.रु. 1,00,000/-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची पूर्व परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगांसाठी र.रु. 25,000/-
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) ची मुख्य परिक्षा उत्तीर्ण होणाऱ्या दिव्यांगांसाठी र.रु. 50,000/-

अधिक माहिती व अटी-शर्ती साठी येथे क्लिक करा