नाशिक महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग
शाळांमध्ये विशेष विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविताना विशेष पद्धतींचा अवलंब करावा लागतो. दिव्यांग मुलांच्या संपूर्ण पुनर्वसनाकरिता पालक, विशेष शिक्षक, थेरपिस्ट, समाज या सर्वांचाच सहभाग असावा लागतो. त्यातूनही विशेष मुलाच्या शिक्षणामध्ये पालकांची भूमिका सर्वात महत्वाची असते. दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यताप्राप्त शाळा, संस्था, राष्ट्रीय संस्थांच्या दिव्यांग मुलांचे शिक्षण व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी पालकांना फी देण्याकरिता अर्थसहाय्य दिले जाते.