नाशिक महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग
कर्णबधिरत्व /कर्णदोष हे भाषावाढीसाठी व वाचा विकासासाठी अत्यंत अडचणीचे ठरते. भाषा व वाचा विकासासाठी बुद्धीइतकीच निरोगी कर्णेद्रियांची गरज असते. जन्मतः कर्णबधिर असलेली मुले त्यांचे आजूबाजूच्या वातावरणातील तसेच बोलण्याचा आवाज ऐकवू न आल्यामुळे बोलू शकत नाहीत.
सदरची बाब लक्षात घेता कर्णबधिरांना Cochlear Implant सर्जरीसाठी रुपये ३,००,०००/- (अक्षरी तीन लाख रुपये मात्र) तसेच Mapping, औषधोपचार, थेरपी, प्रशिक्षण व इतर चाचण्यांकरिता रुपये ५०,०००/- असे एकूण सहाय्य दिले जाते.