नाशिक महानगरपालिका दिव्यांग कल्याण विभाग
समाजातील प्रत्येक व्यक्ती संपूर्णपणे स्वावलंबी असावी ही मुलभुत संकल्पना आहे. परंतु नैसर्गिकरित्या आलेल्या शारिरीक मर्यादा व एक विशिष्ट मर्यादेपलिकडे न येणारे स्वावलंबत्व यामुळे कित्येक व्यक्तींना समाजामध्ये परावलंबी आयुष्य जगावे लागते. मुख्यत्वे बौद्धिकरित्या दिव्यांगत्व असणारे किंवा बहुदिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्ती नैसर्गिक मर्यादांमुळे अथक प्रयत्नांनतरही स्वतःचा चरितार्थ चालविण्याकरिता अधिकतर असमर्थ ठरतात. अशा व्यक्तींना प्रतिमाह रुपये २,०००/- प्रमाणे प्रतिवर्ष रुपये २४,०००/- आर्थिक सहाय्य मंजुर करण्यात यावे.